बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने चांगला निर्णय घेतला आहे. परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) सध्या सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये पुरेसे अंतर निश्चित करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. तसेच कोरोना संदर्भात अनेक उपाययोजना राबावं आहे.
यामध्ये कोरोना काळात प्रवास करताना कोणताही धोका उद्भवू नये यासाठी परिवहन महामंडळ खबरदारी घेत आहे. आता तर राज्य परिवहन महामंडळाने खबरदारी म्हणून बस मधील आसन व्यवस्थेत बदल केले आहेत. प्रत्येक सीटमध्ये अंतर ठेऊन आसन व्यवस्थेची रचना केली आहे.