बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत भाग घेणाऱ्या उमेदवारांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिरिक्त सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
केएसआरटीसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सेवा मुख्य जिल्हा, तालुका ते परीक्षा केंद्रांच्या मुख्यालयापर्यंत (२३ ऑगस्ट) आणि परीक्षेच्या दिवशी (२४ ऑगस्ट) पर्यंत असेल असे म्हंटले आहे.