बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण पश्चिम रेल्वेने (एसडब्ल्यूआर) सोमवारी केएसआर बेंगळुरू रेल्वे स्थानकात दोन वेंडिंग मशीन बसविल्या असून प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर्स आणि इतर वैयक्तिक संरक्षक उपकरणे उपलब्ध होणार आहेत.
प्रवाशाला सहज प्रवेश मिळावा यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याच्या ठिकाणी वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. एक मशीन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आणि दुसरे प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरील स्टेशनच्या दुसर्या एंट्रीवर उपलब्ध आहे, एसडब्ल्यूआरने एका निवेदनातून ही माहिती दिली आहे.