जानो पॅन्थर गदगचा भटकळवर †िवजय
बेळगाव ः कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात जानो पॅन्थर क्रिकेट अकादमी गदग संघाने भटकळ स्पोर्ट्स क्लबचा 36 धावानी पराभव करून 4 गुण मिळविले. रियाज कोटबाळला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात जानो पॅन्थर क्रिकेट अकादमी गदग संघाने 40.2 षटकात सर्व बाद 179 धावा केल्या. रियाज कोटबाळने 1 षटकार, 2 चौकारासह 38, अमित बालचंद्रपुरने 4 चौकारासह 33, प्रल्हाद कलबुर्गीने 4 चौकारासह 23, संदीप पै ने 16, रामचंद्र बडिगेरने 13 धावा केल्या. भटकळतर्फे वासीम श्रीमठने 38 धावात 3, अस्लमने 13 धावात 2, इजाज अहमद व महंमद इम्रान यांनी प्रत्येकी 35 धावात 2 तर महंमद आरिफने 1 गडी बाद केला.प्रत्युत्तरादाखल खेळताना भटकळ संघाचा डाव 37.1 षटकात सर्व बाद 143 धावात आटोपला. त्यात महंमद अस्लमने 10 चौकारासह 75, वासीम श्रीमठने 17, अबुकरने 16, अब्दुल्लाने 13 धावा केल्या. जानो पॅन्थरतर्फे अभिषेक हावनूरने 21 धावात 3, महांतेश होंगलने 33 धावात 3, सतिशकुमार, रियाज कोटबाळ, संदीप पै यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.