क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केएससीए मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत नीना स्पोर्ट्स संघाने विजया अकादमीचा 8 गडय़ांनी, भटकळ स्पोर्ट्स क्लब अ संघाने इंडियन बॉईज बेळगाव संघाचा 26 धावाने तर आनंद क्रिकेट अकादमी संघाने स्पोर्ट्स अकादमी गदग संघाचा 107 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. शतकवीर नागेंद्र पाटील (आनंद) अहंमद अरीफ (भटकळ), नासीर पठाण (नीना) सामनावीर ठरले.
बेळगाव केएससीए मैदानावर विजया क्रिकेट अकादमी संघाने 21.2 षटकात सर्वबाद 113 धावा केल्या. मनोज सुतारने 10 चौकारासह 45, सुशांत पाटीलने 12 तर चिराग गोदवानी व स्वरूप साळुंखे यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. निनातर्फे फिरकी गोलंदाज नासीर पठाणने 55 धावात 4, नरेंद्र मांगुरेने 29 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल नीना स्पोर्ट्स संघाने 12.2 षटकात 2 गडी बाद 114 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. अंगदराज हित्तलमनीने 1 षटकार 8 चौकारासह 51, दर्शन पाटीलने 7 चौकारासह 36, तर नरेंद्र मांगुरेने 18 धावा केल्या. विजयातर्फे चिराग गोदवानी, सुजल कळसण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
आरआयएस हुबळी मैदानावर भटकळ स्पोर्ट्स क्लब अ संघाने 26 षटकात सर्वबाद 163 धावा केल्या. महंमद अस्लम काटापाडीने 45, अब्दुल बाकी 4 षटकार 2 चौकारासह 40, महंमद जियानने 14, इस्माईलने 13, स्वाफ काजीने 11 धावा केल्य. इंडियन बॉईजतर्फे गौस पिर हाजीने 43 धावात 4, परवेझ मोरबने 9 धावात 3, हुलकान मुल्लाने 2, केदार कटनौकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल इंडियन बॉईज संघाचा डाव 29.4 षटकात सर्वबाद 137 धावात आटोपला. गौरपीर हाजीने 31, शहारूख देसाईने 26, निहाल पाटीलने 19 धावा केल्या. भटकळतर्फे आरीफने 31 धावात 4, महंमद इम्रानने 42 धावात 3 1 गडी बाद केले.
केएससीए राजेंद्रनगर हुबळी येथे आनंद अकादमीने 50 षटकात 7 बाद 292 धावा केल्या. नागेंद्र पाटीलने 5 षटकार 15 चौकारासह 115 चेंडूत नाबाद 144 धावा करून आपले दुसरे शतक झळकाविले. आनंद करडीने 35, रूद्रगौडा पाटीलने 27, राहुल नाईकने 24, पीयूष गोहलोतने 19 धावा केल्या. शांतुगौड व विनय बारकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल स्पोर्ट्स अकादमी गदग संघाचा डाव 40.3 षटकात सर्वबाद 185 धावात गुंडाळला. शिवू के. ने 1 षटकार 4 चौकारासह 48, विनय बारकरने 34, सुभाष अंगडीने नाबाद 26, किरणने 20 धावा केल्या. नंदकुमार मलतवाडकरने 20 धावात 3, सचिन मेलगेने 47 धावात 3, वाहिदने 2, तर केतज कोल्हापूरे व ओंकार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.