ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी 70 जागांवर मतदान सुरू आहे. मतदानाच्या दरम्यान नेत्यांचा हल्ला सुरूच आहे. आज सकाळी केजरीवाल यांनी ट्विट करत सर्व महिलांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. परंतु या आवाहना दरम्यान त्यांनी महिलांना पुरुषांकडून मतदानासाठी सूचना घेण्याचा सल्ला दिला.
हाच मुद्दा उचलून धरत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्या म्हणाल्या, केजरीवाल महिलाविरोधी आहेत. तसेच स्मृती इराणी यांनी ‘महिला विरोधी केजरीवाल’ या हॅशटॅगवरुन ट्विट केले की, तुम्ही महिलांना इतके सक्षम मानत नाही की ते स्वतः ठरवू शकतील की कोणाला मतदान करावे?
असे म्हणत स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.