प्रतिनिधी /पणजी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज मंगळवारी चार दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आणि लोकांशी संपर्क साधणार आहेत. केजरीवाल यांच्या चार दिवसांच्या गोवा दौऱयात समाजातील विविध घटकांमधील लोकांशी संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांशी, तसच महिला आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद साधणार आहेत. व्यापारी आणि उद्योगपतींचा समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. चार दिवसांच्या दौऱयातून गोवेकरांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर लवकरच आप आपल्या जाहीरनाम्यात गोव्याच्या समस्यांवरील उपायांचा समावेश करेल.