प्रतिनिधी /सांखळी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी होंडा येथील आजोबा मंदिरात आशीर्वाद घेतले. केजरीवाल यांचे रविवारी गोव्यात आगमन झाले. सोमवारी त्यांनी सत्तरीतील त्यानंतर होंडा येथे श्रीआजोबांचे आशीर्वाद घेतले.
दोन दिवसीय दौऱयावर गोव्यात आलेल्या श्री. केजरीवाल यांना रविवारी गोमंतक भंडारी समाजाच्या मुख्य कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. या समाजाच्या मुख्य कार्यालयाला भेट देणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यानंतर सोमवारी त्यांनी सत्तरी तालुक्यातील म्हावशी व बद्रुक या गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना जमिनीच्या मालकीचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी खाण अवलंबित कामगारांचीही भेट घेतली. राज्यात ’आप’चे सरकार आल्यानंतर सहा महिन्यांत खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे आणि आप चे नेते पुती गावकर उपस्थित होते.