ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील केजरीवाल सरकार ड्यूटी करीत असताना मृत्युमुखी पडलेल्या वायुसेना, दिल्ली पोलीस आणि सिव्हिल डिफेन्सच्या 6 शहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ते म्हणाले, आपल्या कर्तव्याचे पालन करीत असताना मृत्युमुखी पडलेल्या वायुसेना, दिल्ली पोलीस आणि सिव्हिल डिफेन्समधील 6 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये दिले जाणार आहेत.
पुढे ते म्हणाले की, सैनिकांचे हौतात्म्य ही एक न भरुन जाणारी हानी आहे. केजरीवाल सरकारने सत्तेत आल्यानंतर अशा कामगारांच्या कुटूंबाला एक्स-ग्रॅटिया रक्कम देण्याची योजना सुरू केली आहे जेणेकरून ते त्यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन बनू शकतील आणि ते सन्मानाने आयुष्य जगू शकतील.
दरम्यान, दिल्ली सरकारने कोविड 19 च्या संकटात जीव गमावलेल्या सर्व कोरोना वॉरियर्सना एक कोटी रुपयांची मदत केली होती.