चाहत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र
‘केजीएफ चॅप्टर 2’ हा चाहत्यांसाठी चित्रपट नव्हे तर भावनेचा विषय असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. चित्रपटातील अभिनेता यशवर जीव ओवाळून टाकणारे चाहते आहेत. याचमुळे यशच्या चाहत्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी राष्ट्रीय सुटी घोषित करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिण्यात आलेले एक पत्र आता समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. आमच्या भावना समजून घ्या असे पत्राद्वारे मोदींना सांगण्यात आले आहे. केजीएफ ः चॅप्टर 2 हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित होत आहे.
आमच्या भावना समजून घ्या
यशचा केजीएफ ः चॅप्टर 2 चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 16 जुलै रोजी प्रदर्शित होत असल्याचे आम्हा सर्वांना माहित आहे. लोक चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशा स्थितीत त्या दिवशी राष्ट्रीय सुटी घोषित करण्यात यावी अशी विनंती आहे. आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, हा केवळ चित्रपट असून आमच्या भावना आहेत असे यशच्या एका चाहत्याने पंतप्रधानांना उद्देशून लिहिले आहे.
टीजरच विक्रमी
हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात यशने रॉकी हे पात्र साकारले आहे. चित्रपटाचा टीझरग यापूर्वीच प्रदर्शित झाला असून त्याला विक्रमी प्रेक्षक लाभले आहेत. चित्रपटात यशसह श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रविना टंडन यासारखे कलाकारही दिसून येणार आहेत.