कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात 137 व्या जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. बँकेचे पदाधिकारी व अधिकाऱयांच्या हस्ते पुतळय़ाचे पूजन झाले.
यावेळी बोलताना निवेदिता माने म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराज यांचे कोल्हापूरच्या जनतेवर अंनत उपकार आहेत. त्यांच्या दूरदृर्ष्टीमुळेच आज कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे. राधानगरी धरण, लहान मोठे बंधारे, मिरज- कोल्हापूर रेल्वे, ही नेत्रदीपक काम त्यांनी केले आहे.
यावेळी आर. के. पवार, अनिल पाटील, असिफ फरास, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन अधिकारी जी. एम. शिंदे, तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.