बाबा केदारचे दर्शन हिवाळय़ामुळे बंद करण्यात आल्यावर भक्तांसाठी हे तीर्थक्षेत्र बंद आहे. सद्यकाळात प्रचंड हिमवृष्टी तसेच हाडं गोठविणाऱया थंडीदरम्यान केदारनाथ धाम येथून पोलीसही परतले आहेत. पण बाबा केदारचे भक्त साधू ललित महाराज अद्याप तेथेच तपस्येत लीन आहेत.
कित्येक वर्षांपासून महाराजांचा हाच नित्यक्रम राहिला आहे. ते असहय़ थंडीतरही केदारनाथ धाममध्ये राहतात. अक्षरशः गोठवून टाकणाऱया थंडीत ते भक्तीत रमले आहेत. केदारनाथ मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर जुन्या गढवाल मंडळ विकास निगमच्या अतिथीगृहात ललित महाराजांचा आश्रम आहे.
कितीही हिमवृष्टी होवो, ललित महाराज केदारनाथ धाम येथून हलत नाहीत. यात्राकाळात ज्या भाविकांना वास्तव्यासाठी जागा मिळत नाही, अशांसाठी ललित महाराज स्वतःच्या आश्रमात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतात. यात्राकाळात ललित महाराजांकडून दरदिनी भाविकांसाठी निशुल्क अन्नछत्राचे आयोजत करण्यात येते.