वृत्तसंस्था/ मोनॅको
रविवारी येथे झालेल्या पाच कि.मी. धावण्यांच्या शर्यतीमध्ये केनियाच्या बियाट्रिस चेपकोएचने नवा विश्वविक्रम नोंदविला. त्याने या शर्यतीत 14 मिनिटे 43 सेकंदाचा अवधी घेत यापूर्वीचा या क्रीडाप्रकारातील नोंदविलेला विश्वविक्रम एका सेकंदाने मागे टाकला.
29 वर्षीय चेपकोएचने 3000 मी. स्टिपलचेसमध्ये यापूर्वी विश्वविक्रम नोंदविला आहे. युगांडाच्या जोशुआ चेपतेगेईने पुरूषांच्या विभागातील शर्यत जिंकताना 13 मिनिटे आणि 14 सेकंदाचा अवधी घेतला. चेपतेगेई हा 10,000 मी. धावण्यांच्या शर्यतीतील विश्वविजेता आहे.