मुंबई / वृत्तसंस्था
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन आपल्या दुसऱया अपत्याच्या स्वागतासाठी बुधवारी न्यूझीलंडकडे रवाना झाला. आता उर्वरित शेवटच्या आयपीएल सामन्यात तो खेळू शकणार नसल्याचे हैदराबाद प्रँचायझीने जाहीर केले.
‘कर्णधार केन विल्यम्सन दुसऱया अपत्याच्या स्वागतासाठी मायदेशी रवाना होत असून आम्हा सर्वांच्या त्याला, त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा’, असे हैदराबाद प्रँचायझीने ट्वीट केले. सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 3 धावांनी पराभव करत प्ले-ऑफसाठी आशाअपेक्षा कायम राखली. त्यानंतर एकाच दिवसात विल्यम्सन रवाना होत असल्याचे कळवले गेले. कर्णधार विल्यम्सनने या हंगामात 13 सामने खेळत केवळ 216 धावा जमवल्या. हैदराबादचा संघ 13 सामन्यात 6 विजयांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी फेकला गेला असून रविवार दि. 22 रोजी पंजाब किंग्सविरुद्ध त्यांचा शेवटचा साखळी सामना होणार आहे.