बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणातील आरोपी शिवलिंग पाटील याला बेळगाव येथून अटक करण्यात आली आहे, असे बेंगळूरचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी बुधवारी सांगितले.
कर्नाटक लोकसेवा आयोगाने (केपीएससी) घेतलेली ही परीक्षा २४ जानेवारी रोजी होणार होती. त्याआधीच प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना २४ लाख रुपये रोख आणि प्रश्नपत्रिकांसह अटक केली. पोलिसांनी सांगितले की लीक झालेली प्रश्नपत्रिका नोकरीच्या इच्छुकांना विकण्यात आली होती. ही घटना उघडकीस येताच केपीएससीने एफडीए परीक्षा पुढे ढकलली आहे.