वार्ताहर/ केपे
केपे पालिका क्षेत्रातील प्रभाग-5 मधील पाडा-देऊळमळ येथे कारवार भागातून नातेवाईकां˜ाढडे राहायला आलेली एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेले असतानाच या प्रभागातील सोमेश्वर येथील एक युवक व एक युवती अशा दोन व्यक्तांचा प्राथमिक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड निगा केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही घरात विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.
वरील वाडय़ावरील चार व तिळामळ येथील एक असे पाच जण वेर्णा येथील एका कंपनीत कामाला आहेत. यापैकी सोमेश्वर येथील एक युवक व एक युवती यांनी स्वतःहून मंगळवारी केपे आरोग्य पेंद्रात जाऊन चाचणी केली होती. या दोघांचाही अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने या भागातील लोकांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वरील दोघे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या भागात तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच उपनगराध्यक्ष चेतन हळदणकर यांनी या भागातील सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना केले.
पाडा-देऊळमळ या भागात मागच्या आठवडय़ात कारवार भागातून एक व्यक्ती नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. तो गोव्यात येताच त्याची चाचणीही करण्यात आली होती. मात्र अहवाल आला नव्हता. तो अहवाल रविवारी आला असता सदर व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या परिसरातील लोकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ज्या घरात तो राहिला होता त्या घरातील व्यक्तींबरोबर आजुबाजूच्या 4 घरांतील लोकांची चाचणी केली होती. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
काही दिवसांपूर्वी केपे पालिका क्षेत्राच्या प्रभाग-2 मध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्या होत्या. मात्र त्यानंतर केपे परिसर कोरोनामुक्त झाल्याचे दिसत होते. पण आता केपेत पुन्हा रुग्ण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर उपनगराध्यक्ष हळदणकर यांनी सांगितले की, पाठोपाठ आणखी दोन रुग्ण या प्रभागात सापडल्याने लोकांनी सर्तक राहावे.