उपनराध्यक्षपदी विल्यम फर्नांडिस
वार्ताहर / केपे
केपे पालिका मंडळाच्या 28व्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. सुचिता शिरवईकर तर उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस यांची निवड झाली असून त्याना उपमुख्यमंत्री चद्रकात कवळेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे केपे नगरपालिकेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर यांचा दबदबा कायम राहणार आहे. केपे पालिकेच्या तेरा प्रभागात भाजपचे समर्थन लाभलेले 9 तर काँग्रेस पक्षाचे समर्थन लाभलेले 4 उमेदवार निवडून आले होते.
केपे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद यावेळी महिलांसाठी आरक्षित होते. त्यामुळे नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजप समर्थक दोन महिला निवडून आल्या होत्या. त्यात सुचिता शिरवईकर व दिपाली नाईक यांचा समावेश होता. त्यात सुचिता शिरवईकर यांना भाजपने संधी दिली आहे. विरोधी पक्षात तीन महिला निवडून आल्या होत्या. मात्र सत्तेवर येण्यासारखे संख्खाबळ नव्हते तरीही भाजपकडून सुचिता शिरवईकर तर काँग्रेस पक्षाकडून जॅकीना डायस यांनी नगराध्यक्षपदा साठी अर्ज केले होते.
तर उपनगराध्यक्ष पदाकरता तीन अर्ज आले होते. भाजप कडून विल्यम फेनाडीस, तर नंदीता प्रभूदेसाई व लुईस फेनाडीस याचे अर्ज आले होते. काल सकाळी 11 वा. केपे पालिकेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदा करता मतदान झाले यात सुचिता शिरवईकर याना 9 तर जॅकीना डायस याना 4 मते पडली तर उपनगराध्यक्ष पदा करता विल्यम फर्नांडिस यांना 9 तर राहिलेले दोन उमेदवार एकाच गटातील असल्याने एकाला तीन तर दुसऱयाला एकच मत पडले.
भाजप कडे दोन महिला नगरसेवक असल्याने असल्याने अडीच-अडीच वर्षाचा कार्यकाळ दोघांना वाटून दिला जाणार असल्याचा अलिखित करार झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, उपनगराध्यक्ष दुसऱयाद निवडून आलेले विल्यम फर्नांडिस यांना दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. चार वेळा निवडून आलेले व दोन वेळा नगराध्यक्ष असलेले दयेश नाईक, तीन वेळा निवडून आलेले व एकदा नगराध्यक्ष पद भूषविलेले फिलू डिकास्टा, मागच्या वेळी उपनगराध्यक्ष असलेले चेतन हळदर्णकर यांना बाजूला काडून फर्नांडिस याची वर्णी लावली आहे. तसेच विषेश म्हणजे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान मिळवलेले व आता पर्यंत कोणतेच पद ज्याना लाभले नाही व शिक्षणात पदवीधर असलेले अमोल काणेकर यांना ही या पदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे.
दुसऱया वेळी निवडून आलेले विल्यम फर्नांडिस याची वर्णी लावून श्री. कवळेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ख्रिश्चन मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालिकेच्या प्रभाग 9, 10, 11, 12 व 13 या पाच प्रभागात ख्रिश्चन मतदारांची संख्या जास्त आहे. तसेच ख्रिश्चन अनुसूचित जमातीचे मतदार आहेत. या पालिका निवडणुकीत हा मतदार उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर यांच्या पासून दूर गेलेला असून या पाच प्रभागापैकी फक्त विल्यम फर्नांडिस हेच एकमेव प्रभाग 13 मधून विजयी झालेले आहेत. उर्वरित सर्व प्रभागात काँग्रेस समर्थक उमेदवार निवडून आलेले आहेत.
26 रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर 9 भाजपचे समर्थक निवडून आल्यानंतर ही काँग्रेसचे ऐल्टन डिकाँस्टा यांनी पालिकेत आपण सत्ता स्थापना करू असा दावा करत भाजम समर्थकापैकी काही नगरसेवक याचा आम्हाला पाठिबा लाभेल असे म्हटले होते. मात्र तसेच काही न होता श्री. कवळेकर यांनी आपले 9 ही समर्थक नगरसेवकांना एकत्र ठेवले व निकाल भाजपच्या बाजून राहत त्याचेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले .
सुचिता शिरवईकर या पहिल्यादाच नगराध्यक्षा बनल्या असून त्या पालिकेत दुसऱयांदा नगरसेविका बनल्या आहेत. असे असले तरीही त्याच्या सासुबाई या तीन वेळा नगरसेविका होत्या व एक वेळा नगराध्यक्षा ही होत्या . तसेच सुचिता या भाजपाच्या महिला समितीवर ही ती कार्यरत आहेत .तर निवडून आल्यानंतर त्यानी नगराध्यक्षापदाचा ताबा घेतला .
केपेत जी विकासकामे राहीलेली आहेत ती पुर्ण करणे व केपेकारांना जे महत्वाची आहेत त्याना प्राध्यान दिले जाईल. सर्वाचे सहकार्याने ती पूर्ण केली जाईल असे नव्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी ताबा घेतल्यानंतर सांगितले.
यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून केपेचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर उपस्थितीत होते. त्यांनी सर्व नगरसेवकांना शपथ दिली.