उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते उद्घाटन, ऑक्सिजन सिलिंडरसह 50 खाटांची सोय
प्रतिनिधी / केपे
केपे येथील शासकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पन्नास खाटांचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते झाले. पन्नास खाटा, प्रत्येकी एक ऑक्सिजन सिलिंडर अशी सोय असून दिमतीला केपे, कुडचडेतील तसेच खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील रुग्णांना येथे भरती करण्यात येणार असले, तरी केपे भागातील रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रामुळे सरकारी इस्पितळावरील भार बराच कमी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. कोविडविरुद्धच्या लढय़ात सरकारला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, गोव्यातील प्रत्येक तालुक्मयात अशी उपचार केंदे व्हावीत अशी आपलीही इच्छा आहे. पण त्यासाठी सगळी सामग्री असणे आवश्यक आहे. यावेळी प्रशासक दीपक देसाई, केपेचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर, मामलेदार देसाई, पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.