समितीची निवड, अध्यक्षपदी रामदास नाईक
प्रतिनिधी / केपे
केपे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सभासदांची बैठक रामदास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली व यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी काही सभासदांनी उत्सव 9 दिवस साजरा करण्याची सूचना केली. परंतु कोविड महामारीमुळे सरकारी नियमांनुसार यंदाचा गणेशोत्सव दीड दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले. यंदाच्या समितीत अध्यक्ष रामदास नाईक, उपाध्यक्ष अच्युत हेगडे देसाई, खजिनदार संतोष नाईक, उपखजिनदार वल्लभ शेटकर, सचिव नीलेश फळदेसाई, सहसचिव रेमेडियस रिबेलो, सदस्य राजेंद्र प्रभुदेसाई, अभय च्यारी, महेश च्यारी यांची निवड करण्यात आली आहे.