केबल ऑपरेटरकडून रिचार्ज न केल्याने ग्राहकांचे कनेक्शन ठेवले बंद
प्रतिनिधी/ सातारा
एडीएट बॉक्स हे करमणुकीचे साधन हल्ली सगळ्यांच्या घरात असते. अगदी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या ही. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हाताचे काम बंद, येणारा पैसा बंद, त्यामुळे करमणुकीचे साधन असलेला एडीएट बॉक्स म्हणजे टीव्ही जिह्यातील ग्रामिण भागात बंद झाला आहे. केबल चालकांनी ज्या ज्या ग्राहकांचे महिन्याचे रिचार्ज मारले नाही त्याचे कनेक्शन बंद ठेवले गेले तर काही ग्राहकांनी स्वतः हून आपले केबल कनेक्शन बंद ठेवण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. सातारा शहरात मात्र अजून ही चांगली परिस्थिती आहे.
लॉकडाऊन काळात टीव्ही हेच शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना करमणुकीचे साधन बनले होते. मात्र टीव्हीवर ही बातम्या त्याच त्याच कोरोनाच्या लागत असतात. भयावक परिस्थिती अगोदरच जगात आहे. त्यातच सतत हॅमर होत असल्याने अनेकांनी बातम्याच पाहणे बंद केले आहे. तर इतर चॅनेलला धारावाहिक मालिका जुन्याच लावून कशी बशी करमणूक केली जात आहे. मात्र, टीव्हीच्या केबलचे मासिक भाडे हे अडीचशे ते तीनशे रुपयांच्या घरात आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने हातात पैसे नाहीत. जरी काही पैसे हाती असले तरी पुढे आणखी काय होईल या भीतीपोटी ग्राहकांनीच स्वतःहून आपल्या घरी असणारा टीव्हीचे केबल बंद केल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळते. तर काहींनी टीव्हीची केबल वायरच काढून ठेवली असून घरातील जुनी पुस्तक बाहेर काढून ती वाचण्यात आणि घरातल्याच इतर कामात सध्या मग्नग्न असून बाहेरील घडामोडीवर विशेष करून सोशल मीडियावर लक्ष केंद्र केल्याचे दिसत आहेत. ग्रामीण भागात केबल ऑपरेटिंग करणारे काहीजण सक्षम नाहीत. ग्राहकाचे रिचार्ज मारण्यासाठी ते घरातून वसुलीसाठी जाऊ शकत नाहीत. स्वतःचा खिशातले पैसे शहरात असलेल्या बँकेत जाऊन भरणे ही अवघड बनल्याचे चित्र आहे, अशी जिह्यातील परिस्थिती निर्माण झाली आहे.
सातारा शहरातील केबल ऑपरेटरची चांगली स्थिती
शहरात दोन केबल नेटवर्किंग आहेत.सुमारे 20 हुन अधिक केबल ऑपरेटिंग करणारे आहेत. शहरातल्या केबल ऑपरेटिंग करणाऱयांनी सध्या वसुली बंद ठेवली आहे. ज्या ग्राहकांचे फोन येतात त्यांना लगेच रिचार्ज मारून दिला जात आहे. ऑनलाईन पेमेंट काही ग्राहक देतात. शहरात केबल ऑपरेटरकडून ही माणूसकी जपली जात आहे.