पहिल्याच दिवशी 5.20 पट राहिला आयपीओ
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीओ बाजारात सुरु असलेल्या धामधूमीत केमकॉन स्पेशियॅलिटी केमिकलच्या आयपीओला पहिल्याच दिवशी 5.20 पट अधिक बोली लागली आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे. एकूण 5 लाख 23 हजार 626 समभागांसाठी प्रस्ताव मिळालेला आहे. चालू वर्षातला हा पहिला आयपीओ आहे, जो पहिल्याच दिवशी 5 पाचपटपेक्षा अधिकचे सबस्क्रिप्शन मिळवू शकला आहे. बिगर संस्थांच्या गुंतवणूकदारांनी 17.40 लाख समभागांसाठी प्रस्ताव दिला आहे. सर्वात अधिक रिटेल गुंतवणूकदारांनी रक्कम लावलेली आहे.
आयपीओअंतर्गत प्रति शेअरचा भाव 338 ते 340 रुपये निश्चित करण्यात आला आहे. याआयपीओअंतर्गत 165 कोटी मूल्याचे नवे समभाग सादर केले जाणार असून त्यांची संख्या 45 लाखापर्यंत असेल. आयपीओ 23 सप्टेंबरला बंद होणार आहे.
सप्टेंबरमध्ये आयपीओ बाजार तेजीत
चालू वर्षात जानेवारीपासून आयपीओ बाजार सकारात्मक राहिलेला आहे. परंतु सप्टेंबरमध्ये यांनी गुंतवणूकदरांना मोठय़ा प्रमाणात नफा करून दिला आहे. आतापर्यंत आयपीओ आले आहेत, त्यामध्ये सबास्क्रिप्शन चांगले असून लिस्टिंगही तेजीत राहिले आहे.
कॅम्सला चांगला प्रतिसाद
दुसरीकडे कॅम्स अर्थात कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या आयपीओलाही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी 82 टक्के बोली लावल्या गेल्या. रिटेल गुंतवणूकदारांनी 1.40 पट बोली लावल्या होत्या. आयपीओचा भाव 1229 ते 1230 रुपये ठेवला आहे.