बदलापुरातील घटना
बदलापूर / वार्ताहर
बदलापूर एमआयडीसीमधील कजय रेमेडीज या कंपनीत ड्रायरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत विष्णू डमडर (60) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर विजयपथ पिंगवा (20), झगडू मोहतो (56) संतोष जाधव (56) हे तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी 8.45 च्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील एमआयडीसीमध्ये असलेल्या कजय रे मेडिज या केमिकल कंपनीत ड्रायरचा स्फोट होऊन आग
लागली. ज्या शेडमध्ये स्फोट झाला त्याठिकाणी विष्णू धडाम, विजयपथ पिंगवा, झगडू मोहतो, संतोष जाधव हे चार कामगार होते. त्यापैकी विष्णू धडाम यांचा जागीच मफत्यू झाला. तर विजयपथ पिंगवा, झगडू मोहतो व संतोष जाधव हे तीन कामगार भाजले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीची माहिती मिळताच कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग कंपनीच्या इतर भागात पसरली नाही.