ऑनलाईन टीम / तिरुवअनंतपुरम :
कोरोनामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. आता राज्य सरकारनं दिलेल्या नव्या माहितीनुसार केरळमध्ये कोरोनाचा आणखी एक म्हणजेच तिसरा रुग्ण आढळला आहे.
या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. हा रुग्ण नुकताच वुहानमधून भारतात परतला होता.
यापूर्वी चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थिनीला करोना विषाणूची लागण झाली होती. त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये या रुग्णाला दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.