तिरुअनंतपुरम
इंडिगोच्या फ्लाइटमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या विरोधात निदर्शने केल्याप्रकरणी काँग्रेस नेते के.एस. शबरीनाथन यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. विमानातील निदर्शनाची घटना मागील महिन्यात घडली होती. विजयन यांच्या विरोधात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानातच घोषणाबाजी केली होती. पोलिसांनी यापूर्वी शबरीनाथन यांना नोटीस बजावली होती. एका व्हॉट्सऍप ग्रूपमधील चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. शबरीनाथन यांनी विमानात मुख्यमंत्री विजयन यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप झाला होता.