28 वर्षीय अन्नायाह
केरळ विधानसभा निवडणुकीत एक नवा इतिहास रचला गेला आहे. येथे पहिल्यांदाच ट्रांसजेंडर निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. अन्नायाह कुमारीला डेमोक्रेटिक सोशल जस्टिस पार्टीने उमेदवारी दिली आहे. अन्नायाह मुस्लीम लीगचा बालेकिल्ला असलेल्या मालाप्पुरमच्या वेंगरा मतदारसंघात उभी राहिली आहे. याच मतदारसंघातून मुस्लीम लीगचे दिग्गज नेते पी.के. कुन्हाली कुट्टी उभे राहिले आहेत.
कोचीत एका एफएम वाहिनीत आरजे असलेल्या अन्नायाहने आता राजकारणात उतरण्याचा निर्णय घेला आहे. एलेक्स यांचे वय सध्या केवळ 28 वर्षे आहे. माझ्या व्यक्तिमत्वामुळे सार्वजनिक जीवनात अनेकदा भेदभावाला तोंड द्यावे लागते. 12 वीनंतर माझ्या जेंडरमध्ये मला शिक्षण सोडावे लागले. कारण माझे पालक, नातलग, शेजारी आणि समाजातील प्रत्येक घटक माझ्यासोबत भेदभाव करू लागला होता असे ती सांगते
बरंच काही सहन केल्यावर इथपर्यंत पोहोचले आहे. केरळचे लोक ट्रान्सजेंडरची क्षमता ओळखतात, मी प्रत्येक क्षेत्रात काम करू शकते हे ते जाणतात. केरळमधील ट्रान्सजेंडर शिक्षणावर अधिक लक्ष देतात. ते स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवतात आणि त्यानंतर संघर्ष करून प्रत्येक क्षेत्रात काम करू लागतात असे तिने म्हटले आहे.
युडीएफचे ट्रबलशुटर
वेंगरा मतदारसंघातील मुस्लीम लीगचे उमेदवार पी.के. कुन्हाली कुट्टी यापूर्वी दोनवेळा आमदार राहिले आहेत. 2011 आणि 2016 मध्ये ते या मतदारसंघातून निवडून गेले होते. 2017 मध्ये मुस्लीम लीगचे अध्यक्ष ई. अहमद यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मलप्पुरम लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ते उभे राहिले आणि विजयी देखील झाले. 2019 मध्ये कुट्टी पुन्हा खासदार म्हणून निवडून गेले. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देत वेंगरा येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. कुट्टी केरळमध्ये मुस्लीम लीगचे सर्वात मोठे नेते आहेत, त्यांना युडीएफमध्ये ट्रबलशुटर मानले जाते. वेंगरामध्ये 1.82 लाख मतदार असून यातील 70 टक्के मुस्लीम मतदार आहेत.