ऑनलाईन टीम
केरळमध्ये दुबईवरून आलेल्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. कोझीकोडा येथे विमान रनवेवरून घसरून दरीत कोसळले. त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. विमानात क्रु मेंबर्ससह 191 प्रवासी होते. अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
अपघातग्रस्त विमान हे एअर इंडियाचे असून दुबईहून केरळला येत होते. यावेळी कोझीकोडमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. तसेच दृश्यमानता कमी होती. यावेळी कोझिकोडा येथील करिपूर विमानतळावर विमान रनवेवरून घसरले आणि अरुंद दरीत जावून कोसळलं. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले. यामध्ये पायलट आणि को-पायलटचा मृत्यू झाला.
एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली अशून बचावकार्याला वेग आला आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती येणे बाकी आहे.