ऑनलाईन टीम / कोझिकोड :
केरळमधील कोझिकोडहून आज सकाळी कुवेतला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात अचानक फायर अलार्म वाजला. त्यानंतर वैमानिकांनी सतर्कता दाखवत या विमानाचे पुन्हा कोझिकोडमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज सकाळी एअर इंडियाचे विमान 17 प्रवाशांसह कोझिकोडहून कुवेतला निघाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातचं विमानाचा फायर अलार्म वाजला. त्यानंतर वैमानिकांनी सतर्कता दाखवत कोझिकोडमधील विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंगनंतर विमानाच्या कार्गो डब्याला आग लागल्याची माहिती वैमानिकांना मिळाली.