वृत्तसंस्था/ कोची
आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी केरळ ब्लास्टर्स एफसी संघाने आपल्या खेळाडूंसाठी नवे किट उपलब्ध करून दिले असून फुटबॉलपटूकरिता पिवळय़ा आणि निळय़ा रंगाची नवी जर्सी तयार केली आहे.
केरळ ब्लास्टर्स एफसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी क्लबच्या नव्या किटचे अधिकृत उद्घाटन केले. केरळ राज्याच्या सांस्कृतिक कलेची ओळख पिवळय़ा रंगाने केली जात असल्याने या जर्सीमध्ये पिवळय़ा रंगाचा समावेश करण्यात आला आहे. या जर्सीवर केरळमध्ये उत्पादित होणाऱया फणस, केळापासून तयार केलेल्या चिप्स यांची छायाचित्रे या जर्सीवर आहेत.