वृत्तसंस्था/ कोची
2021-22 हिरो पुरस्कृत इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी केरळ ब्लास्टर्स एफसी संघाची घोषणा करण्यात आली असून इव्हान व्हेकोमेनोव्हिककडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
आगामी आयएसएल स्पर्धेतील सलामीचा सामना केरळ ब्लास्टर्स एफसी-एटीके मोहन बगान एफसी संघात 19 नोव्हेंबरला गोव्यातील फातोर्डा स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. गेल्यावर्षीच्या केरळ ब्लास्टर्स संघातील 16 फुटबॉलपटूंचे करार यंदाही कायम ठेवले गेले आहेत.
केरळ ब्लास्टर्स एफसी संघ- गोलरक्षक- ए गोम्स, प्रभसुंकेन सिंग गिल, एम शबीर, सचिन सुरेश, बचावफळी- संदीप सिंग, निशूकुमार, अब्दुल हेकू, एच.रूवेह, मार्को लेस्कोव्हिक, डी. मेताई, संजीव स्टॅलिन, जेसी कार्नेरो, मध्यफळी- जेक्सन सिंग, हरमनज्योत काबरा, ए. अधिकारी, गिव्हसन सिंग, एल. खेलारींग, के. प्रशांत, बारेटो, एस अब्दुल समाद, सेटीसेन सिंग, एपी राहुल, ए.लुना, स्ट्रायकर्स- सी. गेलसेन, जार्ज डायस आणि व्हेझक्वेझ.