थिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सलग दुसऱया सरकारची स्थापना 20 मे या दिवशी होणार आहे. मुख्यमंत्रिपदी पुन्हा पिनराई विजयन यांचीच निवड करण्यात आली असून ते एका साध्या समारंभात शपथग्रहण करणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात 21 जणांचा समावेश राहणार असून सर्व मंत्र्यांना त्याच दिवशी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. दोन आठवडय़ांपूर्वी डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत मोठे बहुमत मिळविले आहे. शपथविधीनंतर काही दिवसांमध्येच नव्या मंत्र्यांचे खातेवाटप होणार आहे.