अक्कलकोट : प्रतिनिधी
केरळ राज्य सरकारच्या अंतर्गत व विश्वविद्यालय धनसहाय्य आयोग दिल्ली यांच्या अनुमतीने लाल बहाद्दूर शास्त्री एल बी. एस. सेंटर,( केरळ परीक्षा आयोग ) तिरुवानंतपुरंम यांनी दि ९ जानेवारी २०२२ रोजी केरळ राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा (के. सेट) एकूण ३७ विषयात आणि केरळ राज्याचा चौदा सेंटर म्हणजे तिरुवानंतपुरम, कोलम, पठानामथिट ,अलपुज, कोट्टायम, इदुकी, येरणाकुलम, त्रिसूर, पलकड, मल्लपुरम, कोझी कोड, वायनाड, कनूर आणि कासरगोड मध्ये सेट परीक्षा घेण्यात आले.
या परीक्षेत एकूण दोन पेपर होते. पहिला पेपर अध्यापन व संशोधन अभियोग्यता मध्ये ९ प्रश्न व दुसऱ्या पेपर इंग्रजी साहित्य मध्ये ३१ प्रश्न असे एकूण ४० प्रश्न अक्कलकोटचे सेट नेट स्पर्धा परीक्षा लेखक धानय्या कौटगीमठ लिखीत पुस्तकातून आले असून, विद्यार्थ्यांना याचा खूपच लाभ होत आहे. धानय्या कौटगीमठ यानी देशातील विविध राज्यातील 30 सेट परीक्षा, 3 नेट परीक्षा,8 टी ई टी परीक्षा, 1 पीएचडी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम प्रस्तावित केले आहे. त्या परीक्षेच्या अभ्यासाचे अनुभव इतर विद्यार्थ्यांना व्हावे या उद्देशाने ते एकूण १६ पुस्तके लिहिले आहेत.नवीन अभ्यासक्रम अनुसार खूप चांगल्या पध्दतीने विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत परीक्षाभिमुक माहिती लिहिलेली आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या राज्यात झालेल्या परीक्षेत सुध्दा धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकातून अनेक प्रश्न आल्याने कौटगीमठ यांचे हे पुस्तके विद्यार्थ्यांना एकदीपस्तंभ म्हणून लाभ होत आहे.