दरदिवशी सरासरी 400 जणांची तपासणी, आतापर्यंत 4 कोविड रूग आढळले
उदय सावंत/केरी.
परराज्यातून गोव्यात येणाऱया नागरिकांची अवघ्या आठ दिवसांमध्ये केरी तपासणी नाक्मयावर जवळपास अडीच हजार जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात फक्त चार नागरिक कोवीड बाधित सापडले असून प्रत्येक दिवशी जवळपास चारशे जणांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी नाक्मयावर कोवीड तपासणी करणारे व्यवस्थापन प्रामाणिकपणे काम करीत असून कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसल्याचे व्यवस्थापनाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. परराज्यातून येणाऱया प्रत्येक नागरिकांची तपासणी नाक्मयावर तपासणी करण्याचे आदेश गोवा सरकारने दिले आहेत. या संदर्भाची ही प्रक्रिया गेल्या आठ दिवसापासून सुरू झालेली आहे. केरी तपासणी नाक्मयावर यासंदर्भाची तपासणी करण्यास प्रारंभ झाला असून अवघ्या नऊ दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तपासणी प्रक्रियेच्या अधिकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
आठ दिवसापासून तपासणी सुरू.
आठ दिवसापासून तपासणी प्रक्रियेला प्रारंभ झालेली आहे .24 तास तपासणी प्रक्रिया सुरू असून बेळगाव भागातून येणाऱया प्रत्येकाची चाचणी करण्यात येत आहे .सध्यातरी चाचणीद्वारे ही तपासणी प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱयांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दिवस-रात्र तपासणी करण्याची प्रक्रिया खास पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे .यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. आतापर्यंत जवळपास अडीच हजार जणांची तपासणी करण्यात आली असून यात फक्त चार नागरिकच कोवीड बाधित असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की दर दिवशी सरासरी 400 जणांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीची प्रक्रिया फक्त एक मिनिटाची आहे. मात्र कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून या संदर्भात अहवाल प्राप्त करण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे लागत असतात. यामुळे या नागरिकांना 20 ते 25 मिनिटे तपासणी परिसरामध्ये राहावे लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा दिरंगाई होत नसल्याचे याअधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
वाहने अचानक आल्यावर गर्दी.
गेल्या चार दिवसापासून मोठय़ा प्रमाणात नागरिक गोव्यामध्ये येत आहेत. गोव्यात कोवीड बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे नागरिक व पर्यटक राज्यांमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले आहे .गेल्या चार दिवसांपासून नागरिकांची संख्या वाढू लागल्यामुळे अचानकपणे तपासणी नाक्मयावर अनेक वेळा गर्दी होताना दिसत आहे. यामुळे काही प्रमाणात उशीर होऊ शकतो. मात्र दिरंगाई होत नसल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे. प्रत्येकाचे एंटीजन तपासणी करणे अनिवार्य आहे. यामुळे एकाही नागरिकाला तपासणीविना गोव्यात प्रवेश देता येत नसल्याने तपासणी नाक्मयावर अनेक वेळा बऱयाच प्रमाणात गर्दी निर्माण होताना दिसत असल्याचे याअधिकाऱयाने सांगितले आहे.
कोवीड रूग्ण पोंलिसांच्या स्वाधीन. दरम्यान आढळून आलेल्या कोवीड रुग्णाबाबत विचारण्यात आले असता अधिकाऱयांनी सांगितले की परराज्यातून येणाऱया नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर जे नागरिक कोवीड बाधित असल्याचे स्पष्ट होते . त्यांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत असते.त्यांना एक तर माघारी पाठविण्यात येत असते किंवा गोवा सरकारच्यावतीने त्यांना इस्पितळात दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.