भाविकांच्या दर्शनासाठी खुले,अंलकार कार्यकारी समितीच्या ताब्यात
वाळपई/ प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील व गोमंतकातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया केरी सत्तरी येथील श्री सातेरी केळबाई आजोबा देवस्थानाचे दैनंदिन पूजा-अर्चा सुरू आहे. ते बंद करण्यात आले नाही. 27 रोजी साजरा करण्यात आलेल्या कालोस्तवावेळी काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती .त्यामुळे हे देवस्थान बंद असल्याचे दिशाभूल करणारी माहिती एका वर्तमानपत्रांमधून (तरुण भारत नाही) प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात कार्यकारी समितीने स्पष्टीकरण दिले असून देवस्थानचे दैनंदिन पूजाअर्चा सुरू असून भाविक देवीचा आशीर्वाद घेऊ शकतात असे स्पष्ट केलेले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
याबाबतची माहिती अशी की 27 रोजी देवस्थानच्या पारंपारिक कालोस्तवावेळी काही महाजनांमध्ये निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या संयुक्त मामलेदार तथा प्रशासक संजीवनी सातार्डेकर यांनी हा उत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता .यामुळे कालोस्तव साजरा होऊ शकला नाही। मात्र देवस्थानचे त्यादेवस्थानचे सर्व धार्मिक उपक्रम पार पाडण्यात आले. काही महाजनात देवस्थानच्या अधिकार प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून मतभेद निर्माण झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर हा कालोस्तव स्थगित करण्यात आला. यासंदर्भाचे वृत्त एका वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊन देवस्थानाला टाळे ठोकण्यात आल्याचे म्हटले होते .यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या संदर्भात देवस्थान समितीने स्पष्टीकरण दिले असून व्यवस्था?चे दैनंदिन पूजाअर्चा सुरू असून भाविक देवीचे दर्शन घेऊ शकतात असे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे गावस -गावकर या समाजाने देवीचे सोने गायब असल्याची तक्रार पोलीस स्थानकावर नोंदवलेले आहे. यासंदर्भात माजिक व हळीद या महाजन गटांना विचारले असता सदर संबंधाचे स्पष्टीकरण कार्यकारी समिती देऊ शकते असे म्हटले होते.
यासंदर्भात कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱयांची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की देवतांचे सोने अजिबात गायब झालेले नाही. या देवस्थानच्या प्रशासक संजीवनी सातार्डेकर यांनी या देवस्थानच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी कार्यकारी समितीकडे दिलेली आहे .कारण ही समिती सरकारशी सलग्नीत असून त्याची कायदेशीररित्या नोंद झालेली आहे. यामुळे देवतांच्या मौल्यवान वस्तू या महाजन गटांकडे न देता त्याकार्यकारी समितीकडे देण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार देवस्थानच्या सोने हे कार्यकारी समितीकडे असून ते अजिबात गायब झालेले नाही. यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यामुळे या संदर्भात स्पष्टीकरण करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सध्यातरी सध्यातरी देवस्थानची दैनंदिन पूजाअर्चा सुरू आहे. मात्र पारंपारिक व धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात निर्णय त्याचवेळी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या देवस्थान समितीचा ताबा कार्यकारी समितीकडे आल्यानंतर देवस्थानचे सर्व धार्मिक व पारंपारिक उत्सव सुरू करण्यात आले. गेल्यावषी अनेक वर्षे बंद असलेला शिगमोत्सव उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपन्न झाला. यामध्ये हजारो भाविक व नागरिकांनी सहभाग दर्शविला होता .त्याचप्रमाणे दुर्गा पूजन उत्सव असे अनेक उत्सव सुरू करून या देवस्थानाच्या पावित्र्य राखण्यासंदर्भात कार्यकारी समितीने आपल्यापरीने प्रयत्न केलेले आहेत. देवस्थानच्या अख्यायिकामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची पूर्ण जबाबदारी समितीकडे असून त्या अनुषंगाने वेगवेगळय़ा प्रकारचे पारंपरिक व धार्मिक उत्सव साजरा करण्यात आलेले आहेत .मात्र कालोत्सव यामुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती व काही महिन्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद त्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱया काळात हे उत्सव साजरा करण्या संदर्भात त्याचवेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केलेले आहे.