प्रतिनिधी/ चिकोडी
सवंगडय़ासह खेळताना विहिरीत पडल्याने 9 वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी केरूर (ता. चिकोडी) हळ्ळदकेरी मळय़ात घडली. आकाश तुकाराम माळी असे मृत बालकाचे नाव आहे.
सवंगडय़ासह खेळता खेळता आकाश विहिरीत पडला. त्याच्या समवेतच्या मुलांनी पालकांना याची माहिती दिली. पालकांनी आपल्या सहकाऱयासह विहिरीत मृतदेहाचा शोध घेतला, पण तो सापडला नव्हता. अखेर चिकोडी येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताच कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांचे डोळेही पाणावले. अंकली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.