प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वेचा प्रयत्न भारताला डिजिटल इंडिया मध्ये बदलण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, एसबीआय ‘योनो मर्चंट ऍप’ बुधवार 20 रोजी कोकण रेल्वे आणि स्टेट बँकेच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे जादा भाडय़ाच्या पॅशलेस संकलनासाठी लाँच करण्यात आला.
कोकण रेल्वेवरील रेल्वे तिकीट परीक्षकांकडून जादा भाडय़ाचे पॅशलेस संकलन कोकण रेल्वेला डिजिटल सक्षम बनवण्याच्या दिशेने एक पाऊल रोख तूट नसलेली संस्था, केआरसीएल ने रेल्वे तिकीट परीक्षकांनी (टीटीइएस) जमा केलेल्या हार्ड फिजिकल पॅशच्या स्वरूपात आर्थिक व्यवहार दूर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. टीटीईएस स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो मर्चंट ऍपसह सुसज्ज आहे, जे अँड्रॉइडवर आधारित ऍप आहे, जे टीटीईच्या हँडसेटमध्ये स्थापित आहे. जास्त भाडे तिकिटासाठी प्रवाशांकडून रोख रक्कम गोळा करण्याऐवजी YONO ऍपमध्ये तयार केलेल्या क्यूआर कोडद्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी टिटिइएस अधिकृत आहेत. प्रवाशांना QR कोड स्पॅन करण्याची आणि भीम, पेटीएम, गुगल पे, फोन पे इत्यादी कोणत्याही डिजिटल पद्धतीद्वारे पेमेंट करण्याची विनंती केली जाईल यशस्वी व्यवहारावर, ट्रेनमधील प्रवाशांना अतिरिक्त भाडे तिकीट दिले जाईल. या अनुप्रयोगाच्या वापरामुळे रेल्वे तिकीट परीक्षकांद्वारे रोख हाताळणी कमी होईल.
20 ऑक्टोबर 2021 रोजी रत्नागिरी संचालक (वित्त), एल के वर्मा, मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक, मॅथ्यू फिलिप रत्नागिरी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी स्वपन घोष यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा अनुप्रयोग कोकण रेल्वेवर लाँच करण्यात आला. त्यावेळी संचालन अधिकारी, अमित राज, उपाध्यक्ष आणि सतीश नाईक, एजीएम यांचीही उपस्थिती होती. कोकण रेल्वे अधिकारी राजेश एफ. ए. आणि सीएओ, उपेंद्र शेंडय़े, प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक यांचीही उपस्थिती होती. भारताला डिजिटल इंडिया मध्ये बदलण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून कोकण रेल्वेचा हा प्रयत्न आहे.