गळय़ातील टायवरून पटली ओळख : दोघा आरोपींना केले जेरबंद : शिर धडावेगळे करून मृतदेह फेकला हिरण्यकेशी नदीपात्रात
प्रतिनिधी /बेळगाव
मुंडके विरहीत मुलाचा मृतदेह हिरण्यकेशी नदीपात्रात फेकून देण्यात आला होता. केवळ त्याच्या हातात असलेल्या गळय़ातील टायवरून या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे. केवळ सहा दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावलेल्या अधिकाऱयांचे व पोलिसांचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी अभिनंदन केले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकरणाची हकीकत सांगितली.
होसूर (ता. हुक्केरी) येथील शाळकरी मुलाचा खून करण्यात आला. अत्यंत शांत डोक्मयाने हा खून करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले होते. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, गोकाकचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक मोहम्मद रफीक ताशिलदार, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ आणि संकेश्वर पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रल्हाद चन्नगेरी यांनी आपल्या सहकाऱयांच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला आहे.
होसूर येथील त्या मुलाने आपले काही तरी प्रकरण पाहिले आहे. त्यामुळे त्याचा काटा काढणे महत्त्वाचे आहे, या विचारातून त्या मुलाला आरोपीने आपल्या दुचाकीवर घेतले. सदर मुलगा दररोज शाळेला सायकल घेऊन जात होता. 20 सप्टेंबर 2022 रोजी जात असताना आरोपीने त्याला तुला शाळेला सोडतो, सायकल येथेच ठेव, असे सांगितले. त्यानंतर त्याला एका उसाच्या शेतात नेऊन त्याचा खून केला.
खून केल्यानंतर तेथेच मृतदेह ठेवून तो घरी आला. रात्री आणखी एका सहकाऱयाला घेऊन त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मुलाचे शिर धडावेगळे केले. धड, सायकल तसेच त्याच्या अंगावरील कपडे एका विहिरीमध्ये फेकून दिले. तर धडविरहीत मृतदेह हिरण्यकेशी नदीमध्ये फेकून दिला. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये हा मृतदेह आढळला होता. त्यानंतर बेवारस म्हणून त्याची नोंद झाली.
पोलिसांनी हा खून झाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र कोणतेच धागेदोरे सापडले नाहीत. त्यानंतर गावातील अनेकांची चौकशी केली. पण काहीच सुगावा लागला नाही. त्यानंतर मृतदेहाच्या हातामध्ये शाळेचा टाय होता. त्यामुळे हा मृतदेह होसूर येथील विद्यार्थ्याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपासाची चपे फिरविली असता संशयित आरोपी आढळला. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. शिर नसल्यामुळे प्रारंभी मृतदेह कोणाचा हाच समजले नाही. मात्र त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तब्बल 50 एकर जमिनीचा ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आला. चार विहिरींचे पाणी पूर्णपणे खाली करण्यात आले. पोलिसांनी रात्रंदिवस या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यामुळेच आरोपी सापडला.