वृत्तसंस्था/ लंडन
2020 च्या प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटी क्लबच्या मध्यफळीत खेळणाऱया फुटबॉलपटू केव्हिन डी ब्रुईन याची सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
बेल्जियमच्या 29 वर्षीय डी ब्रुईनने 2019-20 च्या प्रिमियर लीग फुटबॉल हंगामात 20 गोल नोंदवित अर्सेनलच्या हेन्रीने 2002-03 साली या स्पर्धेत नोंदविलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बुहमान मिळविणारा डी ब्रुईन हा बेल्जियमचा तिसरा फुटबॉलपटू आहे. यापूर्वी बेल्जियमच्या जेमी व्हॅर्डी आणि नीक पॉप यांनी हा बहुमान मिळविला होता. डी ब्रुईनने मँचेस्टर सिटीतर्फे सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना 13 गोल केले पण त्याला आपल्या क्लबला प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देता आले नाही.