सातारा :
संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये, अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱया व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. कोरोना विर्षाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठय़ा प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. यानुसार केशकर्तनालय सुरू करण्यास बंदी असून त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केलेस संबंधीतावर भारतीय दंड सहिंता चे कलम 188, 269 व 270 अन्वये गुन्हा दाखल करणेत येईल. कोणत्याही व्यक्तिच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका पत्रकान्वये अधिकराव लक्ष्मणराव चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांना कळविले आहे.