साहित्य : 1 वाटी दही, पाव वाटी वाफवून गार केलेले दूध, 2 चमचे साखर, पाव चमचा रोज इसेंस, 1 चमचा गरम दूध, 4 केशरकाडय़ा, 2 चमचे बदामचे पातळ काप
कृती : चमचाभर गरम दुधात केशरकाडय़ा कुस्करून दहा मिनिटे भिजत घालाव्यात. मिक्सर जारमध्ये दही घालून मिनिटभर फिरवून घ्यावे. नंतर त्यात दुधात भिजवलेल्या केशरकाडय़ा घालून मिक्स करावे. आता त्यात बदामचे पातळ काप आणि रोज इसेंस घालून मिश्रण परत एकदा मिक्सरला लावून घ्यावे. नंतर त्यात वाफवून गार केलेले दूध आणि साखर घालून मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. मिश्रण एकजीव आणि क्रीमी दिसत असल्यास ग्लासमध्ये ओतावे. तयार लस्सी थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावी. आता तयार गार केशर-बदाम लस्सी बदामने सजवून पिण्यास द्यावे.
टीप : या लस्सीमध्ये तुमच्या सोयीनुसार वेलची पावडरही घालू शकता. लस्सीमध्ये पिस्त्याचे पातळ काप अथवा काजूचे तुकडे ही वापरू शकता.