बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात आजपासून केसीईटी २०२० परीक्षेला प्रारंभ झाला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, तसेच उच्च शिक्षण पोर्टफोलिओचे प्रभारी डॉ. अश्वनाथनारायण सी.एन. यांनी सकाळी एका परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना तपासणी करून प्रवेश देण्यात येत होता. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची सर्व काळजी घेण्यात आली होती.
कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) २०२० साठी राज्यभरातून १.९४ लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.