फीनिक्स मास्टर्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित फिनिक्स मास्टर्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात के. आर. शेट्टी किंग संघाने एक्स्ट्रिम स्पोर्ट्स संघाचा 7 गडय़ाने तर विश्रुत स्ट्रायकर्सने फॅन्को क्रिकेट क्लबचा 7 गडय़ाने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. प्रणय शेट्टी, के. आर. शेट्टी, कलीम पठाण विश्रुत स्ट्रायकर्स यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सकाळी युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने 20 षटकात 8 बाद 141 धावा केल्या. जयंत जाधवने 1 षटकार 5 चौकारासह 49, जावेद मुदनूरने 1 षटकार 2 चौकारासह 37, सागर अंगडीने 12, तर सुनिल बस्तवाडने नाबाद 10 धावा केल्या.
एक्ट्रिम स्पोर्ट्सतर्फे नासीर पठाणने 28 धावात 2, तर आनंत माळवी, नंदकुमार मलतवाडकर, विजय कुरी, अलीम माडिवाले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल के. आर. शेट्टी किंग संघाने 18 षटकात 3 बाद 143 धावा करून सामना 7 गडय़ाने जिंकला. प्रणय शेट्टीने 2 षटकार आणि 4 चौकारासह 51, गिरीष नाडकर्णीने 6 चौकारासह नाबाद 42, तर अलिम माडिवालेने 3 षटकारासह नाबाद 25 धावा केल्या. एक्स्ट्रिम स्पोर्ट्स तर्फे जयंत जाधव, संतोष सांबरेकर, सागर गौरगोंडा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात फॅन्को क्रिकेट क्लबने 20 षटकात 7 बाद 107 धावा केल्या. महेश कदमने 4 चौकारासह 27, आरिफ बाळेकुंद्रीने 22, रोहित पोरवालने 16 तर इम्रान सय्यदने 12 धावा केल्या. विश्रुत स्ट्रायकर्सतर्फे ताहिर सराफने 15 धावात 3 मिलींद चव्हाणने 23 धावात 3 तर रब्बानी दफेदारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल विश्रुत स्ट्रायकर्सने 12 षटकात 3 बाद 113 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. कलीम पठाणने 1 षटकार, 3 चौकारासह नाबाद 39, राहुल शिंदेने 7 चौकारासह 34, नरेंद्र मांगोरेने 4 षटकारासह 11 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. फॅन्को तर्फे शंकर होसमनीने 20 धावात 2 तर सुनिल पाटीलने 1 गडी बाद केला.
प्रमुख पाहुणे चंद्रकांत कडोलकर, सलिम गोकाककर, सचिन कलवार यांच्या हस्ते सामनावीर प्रणय शेट्टी, इम्पॅक्ट खेळाडू जयंत जाधव, उत्कृ÷ झेल अमृत बिरोडकर, सर्वाधिक षटकार अलीम माडिवाले तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसंन्ना सुंठणकर, सभासद सुहास कुलकर्णी व संजय मोरे यांच्या हस्ते सामनावीर कलीम पठाण, इम्पॅक्ट खेळाडु मिलींद चव्हाण, उत्कृ÷ झेल सारंग राघोचे, सर्वाधिक षटकार नरेंद्र मांगोरे यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
शनिवारी पहिला क्वालिफायर सामना के. आर. शेट्टी किंग्ज वि. बीसीसी मच्छे सकाळी 9 वा., विश्रुत स्ट्रायकर्स वि. ऍड. पाटील लायन्स यांच्या इलिमनेटरचा सामना 1 वा.