क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केआर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित केआर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साई स्पोर्ट्स संघाने बीसीसी मच्छे संघाचा 45 धावानी तर केआर शेट्टी संघाने विश्रुत स्ट्रायकर्स संघाचा 20 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. पार्थ पाटील साई स्पोर्ट्स, दर्शन पाटील केआर शेट्टी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर रविवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साई स्पोर्ट्सने 20 षटकात 6 बाद 185 धावा केल्या. पार्थ पाटीलने 3 षटकार 3 चौकारासह 47, यश कळसण्णावरने 1 षटकार 3 चौकारासह 40, विनोद देवाडिगाने 1 षटकार 2 चौकारासह 26, राहुल नाईकने 1 षटकार 2 चौकारासह 18 तर गोविंद गावडेने 1 षटकार 2 चौकारासह 17 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे अमर घाळीने 19 धावात 2 तर भरत गाडेकर, दीपक नार्वेकर, आकाश असलकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीसीसी मच्छे संघाने 20 षटकात 8 बाद 140 धावाच केल्या. अमर घाळीने 33, मनोज पाटीलने 30, शिवप्रकाश हिरेमठने 25 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे राजेंद्र दंगण्णावरने 21 धावात 3 तर सुशांत कोवाडकर, पुनीत दीक्षित, आर्यन उपाध्ये यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात केआर शेट्टी संघाने 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या. दर्शन पाटीलने 4 षटकार 5 चौकारासह 60, वैभव कुरूबागीने 4 चौकारासह 34, अंगदराज हित्तलमनीने 24 तर प्रशांत लायंदरने 14 धावा केल्या. विश्रुत स्ट्रायकर्सतर्फे मदन बेळगावकरने 27 धावात 3 तर अनिल गौडा पाटीलने 21 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रुत स्ट्रायकर्सने 20 षटकात 4 गडी बाद 152 धावाच केल्या. संतोष चव्हाणने 1 षटकार 3 चौकारासह 42, तेजस पवारने 2 षटकार 1 चौकारासह 35, आकाश कटांबळेने 1 षटकार 2 चौकारासह 23, विजय पाटीलने 15 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे वैभव कुरूबागी, यासीर नेहाल, अंगदराज हित्तलमनी, अमर यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे झेवियर गोम्स, अभिषेक केसरकर, विनायक पवार, श्रीनिवास हेकली यांच्या हस्ते सामनावीर पार्थ पाटील, इम्पॅक्ट खेळाडू अमर घाळी, सर्वाधिक षटकार मनोज पाटील, उत्कृष्ट झेल विनोद देवाडिगा. दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे ऍड. सुधीर सक्री, ऍड. हणमंत कोंगल, ऍड. एन. बी. पाटील, विजय हिरेमठ यांच्याहस्ते सामनावीर दर्शन पाटील, इम्पॅक्ट खेळाडू वैभव कुरूबागी, सर्वाधिक षटकार दर्शन पाटील, उत्कृष्ट झेल मदन बेळगावकर यांना पुरस्कार देण्यात आले.
सोमवारचे सामनs- बीसीसी मच्छे वि. अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स सकाळी 9.30 वा., के. आर. शेट्टी वि. मार्गरायजिंग स्टार दु. 1.30 वा.