वृत्तसंस्था/ दुबई
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीतील खेळाच्या तिसऱया दिवशी पंचांच्या निर्णयावर भारतीय संघातील सलामीचा फलंदाज के. एल. राहुलने नापसंती दर्शवून नियमाचा भंग केल्याने त्याला दंड करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
या गुन्हय़ासाठी राहुलला त्याला मिळणाऱया सामना मानधनातून 15 टक्के रक्कम दंड द्यावा लागेल. भारताच्या दुसऱया डावातील 34 वे षटक सुरू असताना अँडरसनच्या गोलंदाजीवर राहुल झेलबाद झाला. पंचांनी डीआरएसचा आधार घेत राहुलला बाद ठरविले. पंचांच्या या निर्णयावर राहुलने पॅव्हेलियनकडे परत जात असताना नापसंती दर्शविली. राहुलकडून शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याचे सामना अधिकाऱयांनी सांगितले.