अध्यक्ष मालोजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली सभा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या (केएसए) नवीन कार्यकारिणी मंडळावरील पदाधिकाऱयांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली के.एस.ए.च्या सभागृहात झालेल्या सभेत कार्यकारिणी मंडळाच्या व्हाईस चेअरमपदी दीपक शेळके, ऑन.जनरल सेक्रेटरीपदी माणिक मंडलिक, ऑन. जॉईट जनरल सेक्रेटरीपदी राजेंद्र दळवी यांची तर ऑन. फायनान्स सेक्रेटरीपदी नंदकुमार बामणे यांची निवड करण्यात आली.
केएसएच्या कार्यकारिणी मंडळासाठी नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली होती. या निवडणुकीतून दीपक शेळके, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, नितीन जाधव, महादेव पाटील-मांगोरे, निळकंठ पंडित, दिग्विजय राजेभोसले, संग्रामसिंह यादव, विश्वंभर मालेकर, दीपक उर्फ भाऊ घोडके, बाळकृष्ण पोरे यांची संस्थेच्या कार्यकारिणी मंडळावर निवड झालेली आहे. दरम्यान, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी नवीन कार्यकारिणी मंडळातील नूतन व पदाधिकाऱयांचे अभिनंदन करून संस्थेच्या सर्वांगिण विकास करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.