हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
के. के. कोप्प (ता. बेळगाव) येथील एका वृध्दाने अंगावर पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या मुलीच्या निधनाच्या दु:खामुळे या वृध्दाने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुनाथ राचप्पा नेसरगी (वय 72) असे त्याचे नाव असून गुरुनाथ हे माजी सैनिक होते. मुलीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता रिक्षासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेवून पेटवून घेतले होते.
गंभीर जखमी अवस्थेतील गुरुनाथ यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी या वृध्दाचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.