नवी दिल्ली
दि वॉल्ट डिज्नी कंपनी इंडिया आणि स्टार इंडियाकडून बुधवारी के माधवन यांना अध्यक्ष म्हणून तातडीने नियुक्त केले आहे. माधवन 2019 पासून भारतामधील स्टार आणि डिज्नीचे देशातील मॅनेजर आहेत. तसेच ते टेलिव्हीजनसह स्टुडीओ व्यवसायातही राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. वॉल्ट डिज्नीच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे अध्यक्ष रेबेका कॅपबेल यांनी म्हटले आहे, की माधवन नवीन भूमिकेमध्ये डिज्नी, स्टार आणि हॉटस्टार व्यवसाय सांभाळण्यासह समूहाची रणनिती आणि वृद्धीची जबबादारीही स्विकारणार आहेत. जबाबदारीअंतर्गत चॅनेलचे वितरण, जाहिरात विक्री आणि स्थानिक कंटेंट निर्मितीमध्ये ते योगदान देणार आहेत.