कर्मचाऱयांच्या वसतिगृहात संपविले जीवन
प्रतिनिधी /बेळगाव
पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया एका कैद्याने कारागृह कर्मचाऱयांच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
लिंगाप्पा बुग्गी-पुजारी (वय 48) असे त्या कैद्याचे नाव आहे. तो मूळचा रामदुर्ग तालुक्मयातील नरसापूरचा. पत्नीच्या खूनप्रकरणी त्याला कटकोळ पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने 2013 मध्ये लिंगाप्पाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
लिंगाप्पा यापूर्वी कारागृहातील स्वयंपाक घरात काम करीत होता. अलीकडे शेतजमिनीचे काम व जनावरे चारायला सोडत होता. नेहमीप्रमाणे आपल्या एका सहकाऱयासमवेत तो बुधवारी सकाळी कारागृहातून बाहेर पडला होता. 12 वाजण्याच्या सुमारास सहकाऱयाला अंघोळीला जाण्याचे सांगून तो तेथून निघून गेला होता.
दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास लिंगाप्पाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तातडीने बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस व कारागृह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. न्यायदंडाधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला आहे.
गुरुवारी त्याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार लिंगाप्पा कारागृहात गवंडी काम करत होता. गेली 12 वर्षे तो याच कारागृहात असून सहा महिने पॅरोलवरही जाऊन आला होता. विश्वासू कैद्यांना कामासाठी कारागृहाबाहेर सोडले जाते. खासकरून गार्डन, शेतजमिनीतील कामे व गुरे राखण्यासाठी त्यांना बाहेर सोडण्यात येते. कामानिमित्त कारागृहाबाहेर आला असताना त्याने आत्महत्या केली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.