क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
क्रीडा प्रेमी कै. रत्नाकर शेट्टी यांच्या स्मरणार्थ खुल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा 8 निमंत्रित संघांमध्ये होणार असून, ही स्पर्धा टी-20 च्या नियमानुसार खेळविण्यात येणार आहे. विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक तर वैयक्तिक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट झेल, स्पर्धेतील प्रभावी खेळाडू व मालिकावीर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी नावनोंदणीसाठी पुरस्कर्ते प्रणय शेट्टी व प्रशांत लायंदर यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.