बेंगळूर/प्रतिनिधी
बिदर जिल्ह्यातील बसवण कल्याण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार नारायण राव (वय 67) यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले.
आमदार राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी १ सप्टेंबर रोजी बेंगळूरच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जात होते. दरम्यन आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रुग्णालयाच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर होती. गुरुवारी दुपारी ३.५५ वाजण्याच्या दरम्यान आमदार नारायण राव यांनी अखेरचा श्वास घेतला.