5 वर्षांत पहिले उड्डाण करणार सुपरसोनिक ‘ओव्हरचर’, न्यूयॉर्कहून लंडन येथे 3.5 तासांमध्ये पोहोचणार
1980-90 मध्ये सुपरसोनिक प्रवासी विमान ‘कॉन्कर्ड’ अत्यंत लोकप्रिय होते. पण महागडा प्रवास आणि दुर्घटनेमुळे हे विमान लवकरच इतिहास ठरले. दीर्घ काळानंतर आता सुपरसोनिक युग परतताना दिसून येत आहे. पुढील 5-6 वर्षांमध्ये पहिले सुपरसोनिक प्रवासीविमान आकाशात झेपावणार आहे. डेनवर येथली एअरोस्पेस कंपनी बूम सुपरसोनिकने ‘ओव्हरचर’ सादर केले असून जे 60 हजार फुटांच्या उंचीपर्यंत जाऊ शकणार आहे.
130 मैल प्रतितासाच्या वेगाने न्यूयॉर्क आणि लंडनमधील अंतर हे विमान केवळ 3.5 तासांमध्ये पूर्ण करणार आहे. सद्यकाळात अन्य विमाने हा प्रवास 6.5 तासांमध्ये पूर्ण करतात. ओव्हरचर पूर्णपणे इको-पेंडली इंधनावर चालणार असल्याने शून्य कार्बन उत्सर्जन होणार आहे. युनायटेड या दिग्गज एअरलाइन्स कंपनीने यापूर्वीच 15 विमानांची ऑर्डर दिली आहे.
2025 पहिले विमान तयार होणार
2026 मध्ये पहिली टेस्ट फ्लाइट
2029 मध्ये पहिले प्रवासी उड्डाण
60 हजार फुटांच्या उंचीपर्यंत पोहोचणार
1300 मैल प्रतितासाचा वेग असणार
65-88 बिझनेस क्लास सीट्स असणार